देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
.... चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे

ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,
...सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.

मात्यापित्यांच्या छायेत फुलासारखी वाढले,
आजच्या दिनी ..... च्या चरणावर जीवनपुष्प वाहिले.

नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी
तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित ...... च्या अंगणी

चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी,
..... च्या बरोबर केली सप्तपदी

कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे,
...सह घेतले मी सप्तपदीचे फेरे

फुल आहे गंध भाव आहे अंतरी,
...सह चालले सातपावलांवरी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top