असा असावा माझा प्रियकर ...
भ्रमरासारखा गुंजन करणारा ,
गप्प राहा अस म्हणुन ही बडबड करणारा ,
मनातल त्याच्या निरागस बोलणारा ,

सतत हसणारा अन दुस-यांना हसवणारा ,
दूर राहूनही जवलिक निर्माण करणारा ,
त्याच्या प्रेमाने मोहून टाकनारा ,

त्याच माझ्यावरच प्रेम पाहून दुस-यांना हेवा वाटेल अस राहणारा ,
वसंताताल्या श्रावनाप्रमाने भासणारा ,
अन मुसलधार पावसात प्रणयधुंद होणारा ,

माझ्या मनातल ओळखून मला समजणारा ,
माझ चुकलेल पावुल सावरणारा ,
माझ्या बडबडीवर रागावनारा अन हसणारा ,

माझ्या डोळ्यातून वाहणार पानी त्याच्या ओठाने टिपनारा,
आपलस करून सोबत चालणारा ,
सुख दू:खात सावलिप्रमाने राहणारा,

असा असावा माझा प्रियकर....

Post a Comment Blogger

 
Top