अशी पहिली भेट...
अशी हासलीस तू
तो क्षण गोंधळला होता
अन पुन्हा लाजलीस तू
तेव्हा मोह मला कळला होता

तसे सांगताना तू
हर्ष मनी या भरला होता
डोळ्यांनी पाजलीस फार
रोग मला हा जडला होता

हात सरावा तुझ्याकडे
अन पुन्हा मागे तो वळला होता
नजरेच्या जालीम स्पर्शाने
परवाना हा जळला होता

हात तुझा मज हाती पाहून
स्वच्छ नभही मळला होता
तो तिकडे मी इकडे बरसून
आसमंत हा भिजला होता

शब्द नव्हे तो जगण्याचा अंशच
एक एक मी जपला होता
अशी जवळ तू येता येता
वैशाखवणवा हा सरला होता

Post a Comment Blogger

 
Top