तू येतेस तेव्हा ........
डोळे तुझ्या कडेच पहात राहतात
विसरतात ते आसपासच सगळ .....
आणि शब्दही तुझेच होऊन जातात.....
तू येतेस तेव्हा ......
दिशा सार्‍या रंगून जातात
चंद्रा होतो पोरका
आणि चांदण्याही स्तब्ध होऊन जातात......
तू येतेस तेव्हा.....
वाराही तुला स्पर्शन्यास आतुर होतो
तुझी -माझी सलगी पाहून
मग वाहण्याचा थांबतो.......
तू येतेस तेव्हा......
मी माझा नसतो,
तू परत जाताना........
मीही तुझ्या सोबत असतो.....

Post a Comment Blogger

 
Top