!! नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!

तुझ हसन आणि माझ फसन
कस एकाच वेळी घडल
हे माझ वेड मन
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!१!!

पुनवेच्या त्या मंद प्रकाशात
चेहरा तुझा दिसावा
त्यावर चंद्राचा प्रकाश पडावा
पडलेल्या खळीमधून तो उठून दिसावा
हे कस एकाच वेळी घडल
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!२!!

वाऱ्याचा एक झोका यावा
आलेल्या वाऱ्यान केस तुझे फुलावेत
त्यातील एक केस माझ्या चेहऱ्यावर यावा
आलेल्या केसान मन माझे जिंकाव
हे कस एकाच वेळी घडल
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!३!!

पावसाची एक सर यावी
आलेल्या त्या पावसाच्या सरित
आम्ही दोघानी चिंब भिजाव
तश्याच त्या पावसात
मी तुला उचलून घ्याव
हे कस एकाच वेळी घडल
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!४!!

तुझ्याच विचारत स्वप्नात हरवाव
त्यात तुझा चेहरा समोर यावा
तू त्यात गोड लाजाव
हे कस एकाच वेळी घडल
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!५!!
 
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


Post a Comment Blogger

 
Top