वाढदिवसाच्या दिवशी सतत ३वर्षे मनात ठेवलेले आपले प्रेम मी आपल्या प्रेयसीला सांगणार आहे,

वाढदिवसाच्या दिवशी

मी विचार केला पक्का

खूप खेळलो संथ

आता मारणार मी छक्का !१!


झाडावरच्या पाडाला आता

जास्त पिकू देणार नाही

आहे प्रेम सांगायला

वेळ दवडू देणार नाही ! २!


सकाळीच आला तिचा फोन

म्हटली भेटशील का मला?

आता तिला नाही म्हणायला

पिसाळलेला कुत्रा चावलाय मला !३!


आता मात्र माझी छाती

जाम फुगलेली होती

बाथरूममध्ये बघितले तर

पाण्याची टाकी वाहून चाललेली होती !४!


हाथात गुलाबाचे फुल घेऊन

चाललेलो एकदम खुशीत

आले असते आडवे कोण

तर घेतले असते त्याला मुशीत !५!


बघितले स्टोपवर तर

होती ती उभी

तिच्यासावेत तिचा

मित्र पण होता अभी !६!


तिने केले मला विश

अन म्हटले हा माझा बॉयफ्रेंड

मनी म्हटले, वाढदिवसाला गिफ्ट द्यायचा

हा कोणता नवीन ट्रेंड !७!


मग म्हटली,

अभीला उशीर होतोय मी जाते

जाताना तिने नीट बघितले नव्हते

माझे डोळे पाणावले होते

अन तिच्या पायाखाली माझ्या हाथातले

गुलाबाचे फुल आले होते!८!


Post a Comment Blogger

 
Top