बघुया... तु कस् प्रेम् करतोस ते....!


विचार करुन प्रेमात पडतोस् का..
प्रेमात पडल्यावर् विचार करतोस् ते
कुणाच्या प्रेमात पडायच ठरवतोस् की,
कुणावर् प्रेम् केल्यावर् ठरवतोस् ते
बघुया... तु कस् प्रेम् करतोस ते....!!

भावनांना आवर् घालतोस् कि,
भावनांच्या आहारी जातोस् ते......
मनातील विचारांना बांधुन् ठेवतोस् कि,
विचारांशी मनाला बांधतोस् ते..........
बघुया... तु कस् प्रेम् करतोस ते....!!


मनावर् अंकुश लावतोस कि,
मनावरचे अंकुश काढतोस् ते.......
ओठावर् आलेल्या शब्दांना आडवतोस् कि,
शब्दांना आडवणाऱ्या ओठांना आडवतोस् ते....
बघुया... तु कस् प्रेम् करतोस ते....!!

प्रेम् कस् करायच शिकतोस् कि,
प्रेमात पडल्यावर् काही शिकतोस का ते...
आंधळ्या मनाने प्रेम् करतोस् कि,
प्रेमात पडल्यावर् आंधळा होतोस् ते....
बघुया... तु कस् प्रेम् करतोस ते....!!

स्वतःच्या प्रेमाचा आदर करतोस् कि,
निस्वाःर्थी प्रेमाला साद घालतोस् ते...
प्रेमाकडुन वाटेल ते करवुन् घेतोस् कि,
प्रेमासाठी वाटेल् ते करतोस् का ते.......
बघुया... तु कस् प्रेम् करतोस ते....!!

Post a Comment Blogger

 
Top