कधीतरी एकटे असावे असे वाटते...

सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

त्या वेळी आसपास कोणीही नसावे असे वाटते

आजुबाजुचे रान सारं गप्प गप्प झालेलं असतं

धुक्यानेही रानसारे गच्च गच्च झालेलं असतं

कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं

आणि मग...

सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

आले आले मी आले करत सर धावतं येते

तुझ्या आठवणींचे पिंपळपान मग मनात दाटुन येते

त्या आठवणींच्या जोरावर पुन्हा उंच उडावंस वाटंत

स्पर्श करुन तारयांना खाली खेचुन आणावंस वाटतं

आणि मग...

सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

त्या तिथे आज कुणीही येऊ नये असं वाटंत

अचानक कुठुन तरी आभाळ वर दाटतं

तलावाच्या काठी मग माझं मन भिजु लागतं

पाण्याच्या पार्श्वभुमीवर आपलं इंद्रधनुष्य शोधु लागतं

आणि मग...

सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

पाऊस थांबल्यानंतर निसर्गाची रुपे निरखु लागतं

थव्यांसोबत पक्षांच्या मन मात्र उडु लागतं

गवताच्या पात्यांवर पडलेल्या थेंबाप्रमाणे दुःख सारं मग ओसरु लागतं

कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं

आणि मग...

सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

Post a Comment Blogger

Top