शिकवण तुझी होती,
मी थांबलो नाही,
उमेद उरी बाळगूनी,
जन्मली अशी शिवशाही

स्वप्न हिंदवी स्वराज्याचे,
मग डोळ्यात उभे राही,
कोवळ्या वयात त्या
हाती तलवार जागी होई

गुरू दादोजी सदैव
पाठिशी उभे राही,
मावळ्यांचे बळ
अंगी अंगार पेटवून देई

रामदासांचे बोध
मनी संस्कार देई,
आशिर्वादास सदैव
उभी जय भवानी आई

होता विजय एक,
मनी जागली पुढची लढाई,
जिंकण्याची सर
मनी उत्स्फुर्त करून जाई

विजयाचे सत्र हे चालूच
अन दिवस उजडून जाई,
स्वप्न होता साकार मनीचे,
उर आनंदून जाई

जाहले स्वतंत्र राज्य मराठी,
सुटल्या शपथीच्या गाठी,
स्वराज्याचे लावून तोरण दारी,
स्तुतीशर्करा आली ओठी

... पण आता काय ?

मराठ्यांच्या भुमितच
होतो मराठीचा अपमान,
लढतो जो तिच्यासाठी
त्याचाच होतोय अवमान

का हे होते असे इथे,
का शपथ विस्मरली जाते,
गंध पैशाचा चाखून
आई मराठीचीच दिशाभूल केली जाते

तेव्हा आहे गर्व मनी
मज माझ्या मराठीचा,
पुकारा उठाव आता,
जन्म घेवून शिवबाचा..

होऊन एकीच बळ
नाव ठेवणार्‍यालाच मातीत खेचा,
ऐकले विनम्रतेने तर ठिक
नाहीतर वेळीच नांगी विषाची ठेचा..

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top