“”कितीही आलीत संकटे तरी उत्साह नसतो कमी
दु:खातही सुख खेचून आणतो असे भारतीय आम्ही”
उद्या तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका फन्ड गणेशा येतोय संपूर्ण देवांच्या यादीत एकमेव गणपतीच असा देव आहे, जो प्रत्येकाला आपला सच्चा मित्र वाटतो आणि म्हणूनच या बाप्पावर आपल्या अपेक्षाही अपार असतात अशाच काही अपेक्षा मांडत वैदेहीने चर्चेला प्रारंभ केला “” यंदा आम्ही गणपतीच्या उत्सवात काटकसर करण्याचे ठरवले आहे एकतर सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत त्यामुळे अनंत चतुर्दशीला लोकांना जेवायला बोलवायचं नाही असा निर्णय आमचा झालाय” एनडी :- “”काही नाही कुठलाही देव असं म्हणत नाही की माझ्यासाठी तुम्ही हे कराच सगळे आपल्या लोकांचेच चोचले असतात गणपती बाप्पाला तर चिमूटभर साखरही गोड लागते” श्री :- “” हो पण बाप्पा आपल्या घरचे पाहुणे आहेत त्यांचं स्वागत आणि पाहुणचार हा व्हायलाच हवा ना” निक्‍स :- “”एनिव्हे मला हे सांगा यंदा गणपती बाप्पाला तुम्ही काय मागणं मागणार आहात ?” केके :- “” मी तर म्हणणार आहे की “स्वाइन फ्लू’ घेऊन जारे बाप्पा” श्‍वेता:- “”केवळ स्वाइन फ्लूचं कशाला महागाई पण घेऊन जा म्हणा” श्री :- “” मित्रांनो किती स्वार्थी झालोय आपण बिग बाजारमध्ये सबसे सस्ता मेला लागला की, विनाकारण सेल आहे म्हणून चार-पाच जिन्स सहज घेतो आणि कमिने रिलीज होताच सिनेमॅक्‍सचे ऍडव्हान्स बुकिंग करतो तेव्हा आपल्याला महागाई नाही का बोचत, मात्र देवसंस्कारांच्या वेळेस वाढती महागाईचे चटके मात्र लागतात” श्रीची रियालिटी ऐकल्यावर मात्र सारा कट्टा शांत झाला. चर्चेचा ओघ मंदावला कुठलेही सत्य समोर आल्यावर आपण शांत होतो हा आपला स्वभावच बनून गेलाय आता उद्यावर गणेशोत्सव येतोय त्याचे स्वागत आपण सगळेच करणार आहोत; पण नक्की काय मनात ठेवून यंदा बाप्पाचे स्वागत करायचे? गणेशोत्सव साजरा करून भारतीय संस्कृती जपायची मात्र बाप्पाच्या विराजित स्थानाला चायनामेड वस्तूंनी सजवायचे? पटतयं का तुम्हाला? टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तो एकी निर्माण करण्यासाठी संस्कृती जपण्यासाठी; पण प्रत्येक चौकात आणि गल्लीत सार्वजनिक गणेश मंडळ निर्माण होत असताना विनाकारण पैशाची नासाडी होते आहे असं नाही का वाटत तुम्हाला? केवळ एक मूर्ती आणायची आणि लाकडाने बांधलेल्या कापडी बॉक्‍समध्ये ती ठेवायची म्हणजे झाला यांचा गणेशोत्सव अशा दरवर्षी उगवणाऱ्या शेकडो गणेशोत्सव मंडळांना आळा कोण घालणार? अनंत चतुर्दशीला प्रत्येक गल्लोगल्लीत महाप्रसादाचे वितरण अखेर खाणाऱ्यांनी खावे तरी किती? एकाच दिवशी सगळीकडे खायला मिळत असेल तर ते अन्न वाया जाऊन त्या बाप्पाच्या प्रसादाचा अवमान नाही का होत? जग बदलतंय आपणही बदलायला हवं या महागाईच्या काळात आदर्श गणेशोत्सव मंडळ कसं उभारू शकू याकडे आता प्रत्येक कार्यकर्त्याने प्रकर्षाने लक्ष द्यायला हवं एवढच बाप्पाचरणी मागणं आहे.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top