गणरायाला साकडे!


विघ्नहर्त्या गणराया, शुध्द भक्तिला तू पाव रे,
संभाळ तुझया लेकरांना, नको देऊस तू भार रे!

भक्तीचा मळा फुलेल गणराया, तुझयच चरणी,
थांबव रे परीक्षा आता, ही सर्वांची जीवघेणी!

रोगराईचे तूच कर समुल निवारन,
स्वेन फ्लू, डेंगू, मलेरियाचे तूच कर उच्चाटन!

भूतलावरील प्राणी मातरांवर तूच कर दया,
हाकेला त्यांच्या धावून जा सत्वर तू गणराया!

विनंती हीएक देवा, बरसु दे झरझर पाउसधारा,
धन धाण्याची होऊ दे बरसात, सुखावू दे देश सारा!

तुझया चक्राने थांबव देवा महागाईचा भस्मासुर,
विझव आग पोटातील, दुष्काळ रूपी संकट होऊ दे दूर!

जाऊ दे गणराया थोडी तू राज्याकार्त्यांना,
स्वार्थ सोडूनि पाहु दे, हीच विनंती गणराया,
रक्षण कर सदैव आमचे, मिळू दे तुझीच अपार माया!!!!

Post a Comment Blogger

 
Top