फू बाई फू, फुगडी फू,
दमलास काय जनसामान्या तू…

दर गेले, भाव गेले, आभाळाच्या घरी,
निर्देशांक म्हणे शुन्य माझ्या डोईवर,
आता फुगडी फू…

डाळ बघा देऊन गेली हातावर तुरी,
शंभरात ‘शिजली नाही डाळ’ बाब खरी,
आता फुगडी फू…

शेपुची ही भाजी सध्या मिरविते तोरा,
फतफते अळूचेही चुकविते होरा,
आता फुगडी फू…

साखरेचे खाणार, म्हणे देव त्याला देणार,
देवापुढे ठेवायला साखर कशी पुरणार ?
आता फुगडी फू…

मंदी महागाई मोडी कंबरडे पार,
यात मिळे चार घास तेच आहे फार,
आता फुगडी फू……

Post a Comment Blogger

 
Top