मी हिरो माझ्याच आयुष्याचा


काही दिवसांपुर्वी एक कविता वाचण्यात आली.त्यातली काही वाक्ये फार चांगली आहे.त्यामुळे ती कविता तुम्च्यासाठी पोस्ट करत आहे.

मी हिरो माझ्याच आयुष्याचा
कोणी हिरो सिनेमातला…कोणी खरा…
कोणी खोटा…
कोणी हिरो तिच्या आयुष्यातला…
तर कोणी तुमच्या…
पण मी हिरो माझ्या आयुष्यातला…

सुख काय असतं माहीत नाही
कारण दुःख मोजत आयुष्य चाललंय…
पण जगण्याची माझी जिद्द खरी आहे.
आणि म्हणुणच मी माझ्या आयुष्याचा हिरो आहे…

ना नशिबाची साथ..
सतत कमरेत लाथ
तरिही 'कणा' ताठ…
हे असंच माझं जगणं आहे
आणि म्हणुणच मी माझ्या आयुष्याचा हिरो आहे.

एक हवी स्वप्नसुंदरी
असं सरखं वाटतं.
पण खरं तर ते फक्‍त
स्वप्नातचं परवडत.
माझं जगणं म्हणजे
स्वप्नं आणि वास्तवातला खरा मेळ आहे
आणि म्हणुणच मी माझ्या आयुष्याचा हिरो आहे…

दुसर्‍यांचा आदर्श होण्यापेक्षा
स्वतःच स्वतःसाठी आदर्श व्हा.
कारण खरा हिरो इथे प्रत्येकात दडलाय
पण हेच कळायला माणसा
तुझं सारं आयुष्य खर्ची पडलंय.

पण माझ्यासाठी तरी
मी माझ्या आयुष्याचा हिरो आहे

Post a Comment Blogger

 
Top