1)शिक्षक मुलांना सांगत होते. "मुलानो, जर कोणी बुडत असेल तर त्याचे केस पकडून त्याला बाहेर काढायला हवं. हे तत्व एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही कुणालाही वाचवु शकता." "सर, तरी सगळ्याच माणसांना असं वाचवता येणार नाही." "का? का वाचवता येणार नाही?" "सर, जी माणसं टकली असतील त्यांना कसं वाचवणार?"2)केळी बन्डु नापास होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकान्ना बोलवितात. गुरुजी : मी बन्डुला विचारले कि जर माझ्याजवळ ५ केळी आहेत आणि त्यातिल मी ३ केळी खाल्ली तर खाली किती केळी राहिली ? तर २ केळी राहिली हे साधे त्याला सान्गता आले नाही. बन्डुची आई : काय मास्तर, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय. उद्या २ डझन केळी पाठवुन देते, करुन टाका पोराला पास.3)बाई :- कायरे तुला आज शाळेत यायला उशिर का झाला? विद्यार्थि :- आई ने सांगितले बस बघुन रस्ता ओलांड , पण अर्धा तास झाला बसच गेलि नाहि म्हणुन उशिर झाला.4)बाई :- राजु , कायरे तुला आज शाळेत यायला उशिर का झाला? राजु :- बाई माझे ना रस्त्यात पाच रुपये सांडले, ते शोधत होतो म्हणुन वेळ झाला. बाई :- गप्पु तुला का उशिर झाला? गप्पु :- मि त्याच्या पाच रुपयावर पाय ठेउन उभा होतो ना...5)बंडु ५ विषयांत नापास झाला होता.या वेळी प्रगती पुस्तक वडीलांना दाखव व त्यांची सही आण व ते काय म्हणाले ते सांग अशी शिक्षकांनी त्याला तंबी दीली. दुस~या दिवशी बंडुन प्रगती पुस्तक शिक्षकांना दिले. काय म्हणालें तुझें वडील? त्यांनी विचारल.. ते म्हणाले माझ्या पेक्षा चांगली प्रगती आहे, तुझ्या वयांचा असताना मी ७ विषयांत नापास झालो होता.6)चिंटुन दंगा केला म्हणुन त्याला बाकांवर उभा केला होता. तरीहि त्याचा दंगा चालुच होता. चिंटु बडबड बंद कर अन गपचुप बस गुरुजी ओरड्ले. त्यान बडबड बंद केली व बाकांवर बसला. बाकावर का बसला? उभा रहा गुरुजी ओरड्ले पण सर तुम्हीच म्हणाला ना की गपचुप बस म्हणुन मी बसलो....7)एकदा दोन खट्याळ मुलांच्या रोजच्या त्रसाला कंटाळून त्यांची आई एक गुरूजींना सांगते. गुरूजी म्हणतात मी बघतो काय करायचं ते! ते लहान भावाला बोलवतात नी विचारतात मला सांग देव कुठे आहे? तो काहिच बोलत नाहि. पुन्हा विचारतात मला सांग देव कुठे आहे? मुलगा घाबरून निघून जातो नि त्याच्या दादाला सांगतो. " दादा, दादा अरे देव हरवलाय आणि त्याचा आळ आप्ल्यावर आलाय, पळ लवकर"8)सरांनी वर्गात मुलांना गवत खाणाऱ्या गाईचं चित्र काढायला सांगितलं. बाळ्या नुसताच बसून होता. सरांनी त्याला विचारलं : सर : काय रे, मी तुला गवत खाणाऱ्या गाईचं चित्र काढायला सांगितलं होतं ना? बाळ्या : हे काय काढलंय. सर : अरे पण हा कागद कोरा आहे ! बाळ्या : पण सर, गाईने गवत खाल्लंय, त्यामुळे गवत संपून गेलंय. सर : अच्छा, मग गाय कुठे आहे? बाळ्या : काय सर, गवत खाल्ल्यावर गाय इथे कशाला थांबेल. ती दुसरीकडचं गवत खायला निघून गेली आहे !!!9)एकदा शाळेत शिक्षक मुलाला विचारतात. "सांग धनुष्यबाण कोणी मोडले?" त्यावर तो मुलगा बोलतो "खरचं सांगतो सर मी नाही मोडले". तेवढ्यात वर्गात हेडमास्तर येतात. शिक्षक त्यांना सांगतात सर या मुलाला धनुष्यबाण कोणी मोडले ते माहीत नाही. त्यावर हेडमास्तर बोलतात, "जावू द्या हो, जुने झाले असेल त्यामुळे मोडले असेल".10)गुरुजी : १५ माणसे एका दिवसात एका बागेची सफाई करतात. तर मग ३० माणसे त्या बागेची सफाई किती दिवसात करतील. अमित : काय गुरुजी ! एकदा जर बाग साफ झाली आहे मग परत ती बाग साफ करायची काय गरज आहे?

Post a Comment Blogger

 
Top