तुझ्या शब्दाने

तुझ्या शब्दाने मन
विन घेत राहिले
गुंतत राहिले
कधी आकाशात झेपावले
तर दूर कुठे तरी भटकत राहिले

तू असाच का?
तू तसाच का?
उत्तर शोधत राहिले.

खरा तू पहिल्या भेटीतला
कि आताचा तू खरा
डोळ्यातले भाव खरे
कि एक एक शब्द तुझा खरा

मन वेडे झाले तुझ्या साठी
मी सुधा बावरी झाली
स्वप्नात तुजला पाहताना
भास आहे हा विसरली

धावली पकडायला सावली
सावली असते खोटी विसरली
तुझ्या सोबत संसाराची
स्वप्न पाहत राहिली

आता मन विटले
क्षीण होत गेले
थकले बुजरे झाले

पण

अजून सुद्धा तुझ्या वर
प्रेम करायचे नाही थांबले
तू विसरलास ती पहिली भेट
पण मन माझे अजून
त्या भेटीवरच घुटमळते......!

Post a Comment Blogger

 
Top