तुझ्याजवळ खुप जवळ


तुझ्याजवळ खुप जवळ
असावंसं वाटतंय . . .
ओंजळीत तुझ्या अलगद येऊन
मिटावंसं वाटतंय . . .

केसांतुन तुझी हळुवार बोटं,
लहरावंसं वाटतंय . . .
माझ्या ओठांवर तुझे शब्द,
गावंसं वाटतंय . . .

क्षीण झालेला अश्रु
बिचारा उगीच कण्हतोय . . .
मनातला मऊ स्पर्श,
माझ्यामधे रमतोय . . .

माझा आळसही हलके हसुन
तु झेलावा वाटतंय . . .
क्षण जादु भरे सुगंधी व्हावे,
सुगंधालाही वाटतंय . . .

आपल्यामधलं निष्ठुर अंतर
कमी व्हावं वाटतंय . . .
चौकटीच्या परिघावरती
तूच असावं वाटतंय!

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top